हेअर सलून आणि ब्युटी स्पा इंडस्ट्री - एक संधी. १. कोरोना राज्यात आणि देशात धुमाकूळ घालत असताना त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न प्रत्येक मराठी माणसाने केला पाहिजे. मराठी माणसासाठी सर्वात दुर्लक्षित क्षेत्र म्हणजे हेअर सलून.


२. काही लोकांना लाज वाटेल परंतु व्यवसाय हा व्यवसाय म्हणून पहिला कि कोणत्याही गीष्टी ची लाज वाटत नाही. ह्या विषयावर सविस्तर लिहिण्याचं कारण म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळात होणारी वाढ , आंतरराष्ट्रीय कंपन्यांचं असणारं लक्ष , होणारी उलाढाल हि खूप मोठी असणार आहे.


३. त्यामध्ये प्रामुख्याने मेट्रो सिटी , टायर २ , ह्यावर लक्ष केंद्रित करण्याचा मोठ्या कंपन्यांचा मानस आहे. आजच्या मितीला भारतामध्ये जवळपास १ कोटी पेक्षाही जास्त लहान मोठी सलून, ब्युटी पार्लर , स्पा आहेत. भारतामध्ये आज घडीला ह्या उद्योगाची उलाढाल २५ ते ३० हजार कोटींच्या घरात आहे.


४. ह्यामधे ब्युटी प्रॉडक्ट्स च मार्केट ऍड केलं कि ते जवळपास १ लाख कोटींच्या घरात उलाढाल होते. ह्या क्षेत्राची वाढ प्रतिवर्षी साधारण २०-२२% इतकी असेल असा अंदाज आहे. आज भारतामध्ये शाहनवाज हुसेन ,जावेद हबीब, काया क्लिनिक lakame अँपल नॅच्युरलस ,सारख्या मोठ्या कंपन्या अस्तित्वात आहेत


५. मी कशाला आरशात पाहू ग , मीच माझ्या रूपाची राणी ग हे गीत आताच्या घडीला लागू होत नाही कारण प्रत्येक क्षणाला आपण स्वतःला पाहत असतो.मध्यम वर्गीयांचं वाढलेलं उत्पन्न स्वतःवर खर्च करण्याची निर्माण झालेली आवड,मीडिया मधून आकर्षित होणारे आंतरराष्ट्रीय ब्रँड ,


६. आकर्षित करणारे युनिसेक्स सलून , महिलांचा वाढत जाणारा सहभाग वाढती शहरी लोकसंख्या, सहजतेने उपलब्ध झालेले आंतरराष्ट्रीय ब्रँड चे प्रॉडक्ट्स त्यामुळे ह्या क्षेत्राने मजबूत पकड निर्माण केली आहे. ह्या संधीचा फायदा आपण का करू नये ? आणि तो करायचा ?


७. कोरोना मुळे राज्यातील बहुतांश कामगार हे त्यांच्या त्यांच्या राज्यात परत गेले आहेत, ह्या क्षेत्रामध्ये परप्रांतीय काम करणाऱ्यांचं प्रमाण खूप आहे . हेच कामगार गेल्यामुळे त्यांची पोकळी आपण भरून काढू शकतो . त्यासाठी काय करावं लागेल.?


८. १ मार्केट रिसर्च २ स्किल्ड लेबर ३ भांडवल ४ सलून मधील वेगळेपण (कन्सेप्ट सलून ) ५ लोकेशन ६ आकर्षक मेनू ७ आकर्षक मार्केटिंग ८ कस्टमर सपोर्ट ह्या गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता .


९. ह्यामधे प्रश्न असा आहे कि भांडवल किती लागेल आणि त्याचा ROI किती आहे . ROI ३०-४०% आहे .स्वतःचा ब्रँड तयार करायचं असेल तर भांडवल हि जास्त लागेल आणि मेहनत हि जास्तीची घ्यावी लागेल.तुमचं लक्ष टायर २ टायर ३ शहर असतील तर कमीत कमी भांडवलामाध्ये एक चांगला ब्रँड बानू शकतो.


१०. टायर २ आणि ३ शहरामध्ये उत्तम सर्विस नि माफक दर ठेवला की कस्टमर तुमच्याशी कनेक्ट व्हायला वेळ लागणार नाही . ह्या क्षेत्रामध्ये कामगार सोडण्याचं प्रमाण खूप आहे त्यामुळे तुम्ही त्यांची अधिकची काळजी घेणं गरजेचं आहे.


११. झपाट्याने वाढत चाललेल्या ह्या झगमगत्या जगात तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये रोषणाई नक्कीच घेऊन येणार. पावलोपावली जरी तुम्हाला सलून ब्युटी पार्लर दिसत असतील तरी सुद्धा आपण एक संधी म्हणून ह्या क्षेत्राकडे पहा , येणार काळ हा ह्या क्षेत्रासाठी सुवर्ण काळ असणार आहे.


१२. आपल्याकडे शहरांची कमतरता नाही , मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद नाशिक सोलापूर लातूर सातारा अशी शहर आहेत ह्या शहरामध्ये हा व्यवसाय नक्कीच फलदायी ठरणारा आहे. सुरुवात कशी करायची?


१३. १. बिझिनेस प्लॅन - मार्केट रिसर्च करून एक लिस्ट तयार करा ह्यामधे प्रॉडक्ट्स अँड सर्विसेस तुम्ही देणार आहेत. २. भांडवल निर्मिती - स्वतः , पार्टनरशिप, लोन किंवा तुमच्याकडे जो पर्याय उपलब्ध असेल तो .


१४. ३. लोकशन - काळजीपूर्वक लोकशन निवडा त्यामध्ये दुकानाची जागा किती आहे , व्हिसिबिलीटी , किती सहजतेने लोक येतील अशी जागा निवडा. ४. कायदेशीर बाबी - दुकान परवाना , उद्योग आधार , जीएसटी , ह्याची पूर्तता करून घ्या.


१५. ५. स्किल्ड स्टाफ सिलेक्ट करा. ६. आर्थिक बजेट ठरवा आणि त्यावर बारकाईने लक्ष ठेवा .


ह्या क्षेत्रात काम करणारी मंडळी बाहेरच्या राज्यातील जास्त आहेत , आता ती लोकं गेल्यामुळे एक पोकळी निर्माण होईल आणि त्या संधीच सोन मराठी माणसाने करावे हिच इच्छा. सचिन सुरवसे ८ मे २०२०. #मराठी #म @MarathiBrain @MarathiRT @anil010374 @prash_dhumal


@faijalkhantroll @TUSHARKHARE14 @gpekmaratha @Maaaymarathi #मराठी_उद्योजक #मराठी_ट्विटर


Top