हा लेख मी आमच्या #WeeklyNewsletter साठी लिहायला घेतलाय पण नंतर वाटले कि ट्विटरवरील अनेक #मराठी तरूणांनांही तो ऊपयोगी पडू शकतो म्हणुन तो इथे #Thread स्वरूपातही मांडतोय. हल्ली मोबाईल,टिव्ही,युट्यूब,सोशल मिडीया, गुगलबाबा या सर्वांच्या गराड्यात आपण तोच विचार करतो. #म 1/9


तेच योग्य वाटते जे तिथे दाखवले जाते. मी नेहमीच म्हणतो गुगल किंवा इंटरनेट आपल्याला माहिती देते पण ज्ञान हवे असेल तर सखोल वाचन,मनन,चिंतन आणि कृती हवीच. बऱ्याचदा आपल्याला टिव्हीवरील चर्चा पाहून किंवा सोशल मिडीयावरिल ट्रेंड पाहून तेच अंतिम सत्य वाटायला लागते पण खरे पाहता 2/9 #मराठी


आपण सारासार विचार करणेच बंद केलेले असते. ऊदाहरणादाखल अर्णबचा विचार करा तो खरच पत्रकार आहे?आता तो जो काही मुंबई पोलिसांविरूद्ध बोलतोय ते खरे मानायचे का? किंवा FMCG च्या जाहिराती सांगतात त्यात सर्वसत्य आहे का? महाराष्ट्र किंवा इतर राज्यातील सत्तास्थापनेवेळी वेगवेगळे राजकारणी 3/9


बिनधास्त काहीही बोलून नंतर बेदरकारपणे घुमजावही करतात, अगदी नावाजलेले सरकारी वकील ऊज्वल निकम सरही🙏कसाबच्या बाबतीत (मुद्दामहून) त्याला सहानभूती मिळू नये म्हणून वेगवेगळी वक्तव्य करायचे. तर मुद्दा-टिव्ही,बातम्या,सिनेमे,मालिका किंवा सोशलमिडीया हा तुम्ही त्यांच्याप्रमाणेच विचार 4/9


करावा किंवा ते दाखवतील त्याच दिशेने विचार करावा असाच हेतू डोळ्यांसमोर ठेऊन काम करतात. आपल्याला सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी या सर्व गोष्टींपासून सुरक्षित अंतर राखले पाहिजे.अतिरेक टाळून फक्त आपल्या ज्ञानात भर पडेल एवढाच काय तो त्याचा वापर करावा 5/9


आपल्या वैयक्तिक,व्यावसायीक आणि कौटुंबिक आयुष्यात आनंदी रहायचे असेल तर मन हे शांत, स्थिर आणि प्रसन्न असणे अत्यंत गरजेचे असते. या धावपळीच्या युगात पुस्तकांसारखा खरा मार्गदर्शक आणि मित्र दुसरा कोणताही नाही. बर ती पुस्तक आपल्याकडे असतील तरी वाचायचा कंटाळा येतो,वाचताना झोप येते 6/9


म्हणुन बरेच जण त्याकडे दुर्लक्ष करतात. खरे तर वाचन हे क्रिकेटसारखे असते, त्यातील बाॅल म्हणजे पुस्तक, बाॅलर हा लेखक समजायचा आणि बॅट्समन म्हणजे वाचक. वाचन करताना आपण अलर्ट राहून वाचन करायचे असते जसे एका बॅट्समनला बॅटींग करताना तयार रहावे लागते. आपले Concentration, Practice 7/9


चांगली तेवढा परिणाम ऊत्तम साधला जातो.जास्तीत जास्त धावा मिळतात तसे त्यातून चांगले ज्ञान आत्मसात होते. बरं, यात मजा ही कि बाॅलर कोणता बाॅल टाकणार आहे हे अगोदरच पुस्तकाच्या प्रस्तावनेतून,रिव्हुव्यजमधून आपल्याला बऱ्यापैकी कळालेले असते,गरज असते ती आपल्या चांगल्या वाचनकौशल्यांची 8/9


या पुढे आपण वाचन करताना ते नेमके कसे करावे, वाचताना वेगवेगळे कोणते हेतू असतात, ते का व कसे करावे? वाचताना नेमकी काय काळजी घ्यावी? वाचताना कोणती साधने सोबत असावी? कोणती पुस्तके आणि ती कशी निवडावी ते पाहूया. 9/9 #क्रमश: #मराठी #म #वाचनकौशल्य #वाचन_ही_काळाची_गरज_आहे 🙏


Top