7 फेब्रुवारी 2016. रविवार चा दिवस. बांग्लादेश च्या सेंट्रल बँक चे डायरेक्टर 9व्या मजल्याच्या लिफ्ट मधून बाहेर येतात आणि सरळ back office मधील बजेट आणि अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये जातात. हे डिपार्टमेंट restricted आणि सर्वात जास्त सेक्युर असते. काहीतरी प्रोब्लेम झालेला असतो


आणि त्यामुळेच ते तिथे आलेले असतात. ' प्रिंटर काम करीत नसते ' हाच काय तो प्रॉब्लेम. यात काय विशेष ? हे प्रिंटर बँक च्या सर्व्हर सोबत कनेक्ट असते. बँकेचे transactions logs आणि रिपोर्ट्स रिअल टाइम मध्ये प्रिंट करीत असतं. त्यामुळे हे प्रिंटर 24 तास चालणे गरजेचे असते.


थोड्या वेळात प्रिंटर ठीक होते आणि तांत्रिक बिघाडामुळे जे logs प्रिंट झाले नव्हते ते एका मागे एक प्रिंट होऊ लागतात. डायरेक्टर आणि अधिकारी logs कडे बघतात. काहीतरी विचित्र असते. काय ते कळतच सर्वांची भंबेरी उडते. दरदरून घाम फुटतो. प्रचंड धावपळ सुरू होते.


बांगलादेश च्या सेंट्रल बँक मधून 35 पैश्याच्या ट्रान्स्फर च्या रिक्वेस्ट गेलेल्या असतात विविध देशांमध्ये. या रिक्वेस्ट न्युयॉर्क येथील फेडरल रिझर्व्ह बँकेला पाठविलेल्या असतात जिथे बांगलादेश चे रिझर्व्ह अकाउंट असते इंटरनॅशनल सेटलमेंट साठी.


या 35 transactions ची तब्बल किंमत 1 Billion US dollors इतकी असते. बांगलादेश सारख्या देशासाठी हा एक अख्या GDP चाच एक significant भागच समजा. आणि अश्या प्रकारे बांगलादेश एक बिलियन US डॉलर्स गमवितो. पण कसे ? हि घटना 7 फेब्रुवारी ला घडते पण याची सुरुवात 9 महिने अगोदर झालेली असते.


मे 2015 ( घटनेच्या ९ महिने अगोदर ) बांगलादेश पासून 3000 किलोमीटर दूर फिलिपिन्स या देशात असलेल्या म्यानीला स्ट्रीट वरील RCBC बँकेत चार जण जातात. चार अकाउंट उघडतात. त्यात फक्त 500 रुपये deposit म्हणून ठेवतात. आणि निघून जातात ते परत कधीच न येण्यासाठी.


5 जानेवारी 2016 घटनेच्या एक महिना अगोदर बांगलादेशच्या सेंट्रल बँकेचा कर्मचारी काम आटोपून घरी जातो. त्याला माहित ही नसते की त्याने एका malicious ईमेल वरील लिंक ला क्लिक केले असते. लगेच एक malware इंस्टॉल व्हायला सुरुवात होते. हॅकर्स याद्वारे बँकेच्या सर्व्हर मध्ये घुसतात.


या दिवसानंतर हॅकर्स रोज बँकेच्या सर्व्हर मध्ये घुसून पडताळणी करतात आणि बँकेच्या कामकाजा बद्दल माहिती घेत असतात. आणि त्यांना बँकेचे SWIFT credentials हाती लागतात. SWIFT credentials आंतरराष्ट्रीय transactions साठी वापरतात.


4 फेब्रुवारी 2016 ( घटनेच्या दिवशी ) हॅकर्स चे रोज सर्व्हर मध्ये घुसने चालूच असते पण आज गुरुवारी ते सर्व्हर मध्ये घुसतात ते परत कधीच न घुसण्यासाठी. SWIFT credentials वापरून ते 35 transactions च्या requests पाठवितात आणि गायब होतात.


5 फेब्रुवारी 2016 शुक्रवारी न्युयॉर्क येथील फेडरल बँकेच्या कर्मचारी कामावर येतात आणि बांगलादेश मधून आलेले 35 transactions मार्गी लावत असतात. पैसा हॅकर्स नी ठरविल्याप्रमाणे आशिया मधील विविध देशांमध्ये ट्रान्स्फर व्हायला सुरुवात होते. Transactions चे amount फार जास्त असल्याने


फेडरल बँकेच्या कर्मचाऱ्यांना थोडा संशय येतो पण SWIFT द्वारे requests आल्यामुळे ते थोडे बिनधास्त असतात. तरी ते एकदा confirm करण्यासाठी बांगलादेशच्या बँकेला संपर्क करतात पण शुक्रवारी आणि शनिवारी तिथे वीकेंड असतो.


7 फेब्रुवारी 2016 रविवारी बांगलादेश येथील ढाका येथे सेंट्रल बँकेत पूर्ण गोंधळ माजलेला असतो. 1 बिलियन डॉलर्स चे fraud transactions बँकमधून झालेले असतात. अधिकारी लगेच हे transactions थांबविण्यासाठी न्युयॉर्क येथील फेडरल बँकेला ला संपर्क साधतात पण...


त्या दिवशी रविवार असतो आणि रविवारी अमेरिकेत वीकेंड असतो. आता बांगलादेश मधील सेंट्रल बँकेच्या कर्मचाऱ्यांना सोमवार पर्यंत वाट बघावी लागणार असते. आतापर्यंत घडणाऱ्या गोष्टींमध्ये वेळ आणि नशीब कधीच बँकेच्या कर्मचाऱ्यांना साथ देत नसते..... पण एकदा का होईना देतेच.


सोमवारी बांगलादेश ची सेंट्रल बँक आणि फेडरल बँकेचा संपर्क होतो आणि कळते की 35 पैकी 31 transactions जे की 800 मिलियन डॉलर चे होते स्थगित करण्यात आले होते. कारण पैसे ज्या फाउंडेशन ला पाठवायचे होते त्यावर US चे sanctions होते. काही ठिकाणी फाउंडेशन ची स्पेलिंग चुकली होती.


असेच काही रेड फ्लॅग आले आणि 35 पैकी 31 transactions रद्द झाले. बांगलादेश च्या बँकेचे कर्मचारी खुश होतात. 1 बिलियन पैकी 800 मिलियन डॉलर सुरक्षित असतात. उरले 4 transactions म्हणजे 200 मिलियन डॉलर. हे उरलेले पैसे कुठे जात असतात ?


हे उरलेले पैसे फिलिपिन्स च्या RCBC बँकेत जात असतात जिथे चार जणांनी नऊ महिन्यापूर्वी 4 खाती उघडली असतात. आता हे उरलेले पैसे वाचविण्यासाठी बांगलादेश आणि न्यूयॉर्क फेडरल बँकेचे प्रयत्न सुरू होतात आणि ते फिलिपिन्स च्या RCBC बँकेला संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात पण....


तिथे Chinese New Year ची सुट्टी असते आणि परत एका दिवसाची वाट पाहावी लागते पण तो पर्यंत उशीर झालेला असतो. हॅकर्स पैसे सोमवारीच withdraw करून घेतात, कॅसिनो द्वारे laundered करतात आणि नंतर हार्ड कॅश मध्ये कन्व्हर्ट करतात जेणेकरून ट्रेस नाही होऊ शकणार.


हे उरलेले 200 मिलियन घेऊन हॅकर्स चीन मध्ये जातात. आता पैसे आणि हॅकर्स दोन्ही untraceable होतात. कुणीच काही करू शकत नाही. 200 मिलियन सुध्धा एक मोठीं रक्कम आहे. पैसे तर गेले त्याबद्दल कुणीच काही करू शकत नाही पण घडामोडींवर नक्कीच विचार करू शकतो.


तुम्ही जर लक्ष देऊन वाचले असेल तर लक्षात येईल की बांगलादेश च्या बँकेकडून आणि फेडरल बँकेकडून प्रत्येक गोष्टीसाठी विलंब झाला आणि फिलिपिन्स च्या बँकेकडून सुध्धा. आणि याच विलंबामुळे हॅकर्स ना जास्त वेळ भेटला. कसा ? मी सांगतो


हॅकर्स नी गुरुवारी सर्वात पाहिले प्रिंटर बंद पाडले आणि नंतर transactions च्या request पाठविल्या. प्रिंटर बंद असल्यामुळे बांगलादेश मधील बँकेच्या लोकांना हे कळलं नाही. दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्क येथील फेडरल बँकेला संशय आला पण संपर्क करायला बांगलादेश मध्ये वीकेंड होता.


रविवारी बांगलादेश मधील बँकेत घटना कळताच त्यांनी फेडरल बँकेला संपर्क केला पण रविवारी अमेरिकेत वीकेंड होता. सोमवारी फिलिपिन्स च्या बँकेत संपर्क केला तर तिथे न्यू year ची सुट्टी होती. This was all by design.


आता पैसे आणि हॅकर्स दोन्ही चीन मधील मकाऊ मध्ये आहेत आणि पुढे त्यांचे काय झाले ते नंतर सांगेल. 🙏


Top