#मुंबईचा_जावई हा चित्रपट मुंबईच्या चित्रपटगृहात १९७० साली, झळकला आणि तो सा-या मराठी मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला. प्रत्येक गिरगावकराने किमान दोन- चार वेळेस या चित्रपटाला हजेरी लावली असेल. १०× १५ फुटांच्या चाळीतील खोलीत


नववधुची कशी कुचंबणा होत होती याची ते वास्तव चित्रिकरण व. पु. काळे 'कुचंबणा' या कादंबरीवर हा चित्रपट होता. पुढे याच चित्रपटाचा हिंदी रिमेकझाला, त्याचे नांव आहे. पिया का घर तो ही सिनेमा खूप गाजला पण, तुम्ही काही म्हणा, 'मुंबईच्या जाववयाची' सर नाही. अरुण सरनाईक, सुरेखा कुडची


रत्नमाला शरद तळवलकर या दर्जेदार कलावंतांनी सिनेमाला बहर आणला होता.मोठ्या श्रीमंत घरातील पोर जेंव्हा चाळीतील छोट्या घरात लग्न होऊन जाते तेंव्हा तिची होणारी कुचंबणा प्रत्यक्ष अनुभवावी.चाळीत रहाण्याची मजा वेगळी च असते तिथे कुचंबणा होत असते पण जीव्हाळाही मिळत असतो.सुशिक्षित


सुसंस्कृत पापभिरू मध्यमवर्गीय चाकर मान्यांच्या भावपूर्ण कथा वपुंच्या साहित्यात आढळतात नेमक्या सर्वसाधारण मध्यवर्ती कल्पनेवर आधारित सत्तरच्या दशकात मुंबई कर मध्यमवर्गीयांचं वास्तव्य चाळीतच असायचं . छोट्या आकाराच्या दोन तीन


खोल्यांमध्ये दहा दहा जणांचं कुटुंब वास्तव्याला असायचं . आता आश्चर्य वाटतं पण खरंच कसं काय मॕनेज करत होते तेंव्हा लोक फ्लॅट संस्कृती , टॉवर्स अजून फोफावली नव्हती पण एक मात्र नक्की जागेची अडचण सोडली तर चाळी तलं वास्तव्य सुख दायकच होतं आजची पिढी त्याची कल्पनाही करू शकणार नाही


सुरुवातीलाच दाखवलेल्या दादरस्थित ' भारत महल ' चाळी सारख्या अनेक चार पाच मजली चाळी तेंव्हा मुंबईच्या उपनगरात होत्या आणि लाखो कुटुंबं तिथे सुखेनैव नांदत असत . पहिलं दृश्य पाहताना


पुलंच्या बटाट्याच्याचाळीची आठवण होते तशाच इरसाल चाळकरी मंडळीं विनोदाची एक सुंदर सफर आपल्याला घडणार आहे अंदाज येतो .एकाला एक चिकटून बिऱ्हाड करूंच्या खोल्या पुढे जाण्यायेण्यासाठी पॕसेज गॕलरी गॕलरीत दोऱ्यांवर वाळत टाकलेले कपडे डालडाच्या


डब्यांमध्ये टांगलेली काड्यापेटी एवढ्या खोल्या , त्यातही बेडरूम म्हणून राम मालतीच्या वाट्याला येतं स्वैपाकघर . प्रशस्त घरात लहानाची मोठी झालेली मालती हा प्रकार बघून हतबुद्ध होते किचन ची उघडी खिडकी , खिडकीतून कायमचा येणारा उजेड . हात लांब


केला तर भांडी हाताला लागतील अशी अवस्था गॕसची शेगडी हाताच्या अंतरावर कुरकुरणारा पलंग कशी होणार बिचाऱ्यांची सुहागरात अपरात्री नळाला आलेलं पाणी भरायला किचन ओपन सगळंच ओम फस् मालतीला आणलेला गजरा माळण्याएवढी प्रायव्हसी मिळत


नाही रामला .मालती रामची रवानगी बाल्कनीत करते एवढ्याशा घरात एवढ्या लोकांचं वास्तव्य . सासऱ्यांचा पत्त्याचा अड्डा दिराची नाटकाची तालीम छोटा दीर हरी त्याचं क्रिकेट थोडाही एकांत मिळत नाही राम मालतीला जीव घुसमटतो मालतीचा .ती रामला पहिल्या सारखं गॕलरी तच झोपायचं सुचवते


मालती किचनमध्ये राम गॕलरीत ये जीवन है ईस जीवनका यहीं है रंग रूप हे या सिच्युएशनला एकदम फिट बसणारं सुंदर गीत . रेडिओच्या जमान्यात बॕकग्राउंडवर विविधभारतीवर लागणाऱ्या हिंदी चित्रपट गीतांचा सुरेख वापर केला आहे बासुदांनी वातावरण


निर्मितीसाठी एवढे सगळे लोक दोन छोट्याखोल्या आणि त्याहून लहान किचन एवढ्या टीचभर चाळीतल्या जागेत रहात असतात अवघडच असतं मालतीसाठीसगळं तरीपण ती हळूहळू सगळ्या घरच्यांशी जुळवून घ्यायला शिकते .धाकट्या दिराबरोबर , हरी बरोबर तिची चांगली गट्टी जमते .


त्याला ती आपल्या बाळपणातल्या आठवणी सांगत असते राम मालती दोघांना हवाहवासा वाटणारा एकांत मात्र त्यांना मिळत नसतो सगळ्या प्रकाराला मालती वैतागते झोपडी चालेल पण स्वातंत्र्य हवं .खेड्यातील प्रशस्त घरातून मुंबईतील चाळीच्या


खुराड्यात आलेली मालती , तिची झालेली कुचंबणा सासरची मंडळी नवरा या मात्र जमेच्या बाजू असतात गावाकडून ताऊजी अचानक येतात . त्यांचं खुराड्यासारखं घर बघून काका व्यथित होतात . त्यांना आश्चर्य वाटायला लागतं लाडाकोडात वाढलेली आपली लाडकी लेक इथे राहते कशी ? उद्विग्न


अवस्थेत घराकडे परतलेली वैतागलेली मालती अचानक समोर ताऊंना बघून हळवी होते त्यांच्या गळ्यात पडून रडा यलाच लागते बासुदा परंपरेनुसार इथे कहानीमे ट्विस्ट मालती रडायला लागते तसे काका अस्वस्थ होतात रामला रडण्या चा जाब विचारतात या खुराड्यात आपली


पुतणी राहणार नाही ठणकावतात तिला ते आल्या पावली माहेरी घेऊन जायला निघतात एक वेळ अशी येते कीजागेच्या समस्येला कंटाळून मालती परत माहेरी जाणार ये जीवन है या धूनवर किचन मध्ये राम मालती एकमेकांच्या बाहुपाशात बद्ध होतात सासरच्या संवेदनशील मंडळींचं प्रेम तिला तसं करू देत नाही


या समस्ये चे निराकरण होऊन या हॕपी नोटवरच ही सुखांतिका संपते . निखळ निर्व्याज फॕमिली ड्रामा रोमँटिक कॉमेडी असलेली नक्कीच आवडेल सर्व काही सुखांत कसे होते याचे मनरंजक चित्रण घडते राजश्री प्रॉडक्शनच्या या रोमँटिक कॉमेडी


तून .पुलंनी सांगितल्या प्रमाणे मुंबईकर व्हायचं असेल तर ,बाकी का ही हरकत नाही पण ,जागेचा प्रश्न मात्र तुमच्या वडिलांनीच सोडवलेला असला पाहिजे हेच खरं #rusantusht


थ्रेड👇 #मुंबईचा_जावई✍️ @UnrollThread @UnrollHelper @threadreaderapp @Atarangi_Kp @sachinbuchade1 @devendrajoshi64 @hemant_mahakal @im_umesh_27 @wankhedeprafull @Sandeshsays_11 @Late_Night1991 @SunilPa36503488 @NandewadSainath @Rumani221 @MeMumbaikar8


Top